खुशखबर! एसटीत मिळणार नवीन सुविधा, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा..!

MSRTC ST News : आज प्रतेक घरात मोटार सायकल असली तरी आपल्या कधीतरी एसटीने (ST) प्रवास करावाच लागतो. दूरचा प्रवास तर एसटीनेच करावा लागतो. पावसाळ्यात देखील एसटीचा प्रवास सुखाचा असतो. त्यामुळे अनेक लोक एसटीने प्रवास करण्याला पसंती देतात. तसेच काही लोकांकडे तर एसटीशिवाय दुसरा पर्याय नसतो. असे असताना एसटीने तुमच्यासाठी एक महत्वाची सुविधा आणली आहे. जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल तर या नवीन सुविधेबाबत तुम्हाला माहिती असायला हवी. चला जाणून घेऊया याबद्दल माहिती.

लालपरी म्हणून ओळख असलेली एसटी अनेकदा आपल्याला वेळेवर मिळत नाही. त्यामुळे काही वेळेस तासनतास वाट पहावी लागते. एसटी नेमकी केव्हा येईल याची माहिती आपल्याकडे अजिबात नसते. पण आता आपली एसटी कुठपर्यंत पोहोचली आहे? हे आता आपल्याला आपल्या मोबाईलवर पाहता येणार आहे. एसटीचे लाइव्ह लोकेशन आता समजणार आहे.

एसटी महामंडळाने हे तयार अॅप तयार केले असून याच्या माध्यमातून प्रवाशांना एसटीचे लाइव्ह लोकेशन आपल्या मोबाइलवरच कळणार आहे. त्यासोबतच एसटी तिकिटावरील क्रमांकामूळे गाडीची बस स्टॅन्डवर येण्याची वेळ देखील समजणार आहे. एसटीमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (VLT) बसविण्यात येणार असल्याने एसटी ॲपवर बसची माहिती मिळणार आहे.

येथे वाचा – खुशखबर! या तारखेला खात्यात येणार लाडकी बहिणीचा हप्ता, पहा नवीन तारीख..!

रोस मार्टा कंपनीकडून रूट मॅपिंग पूर्ण करण्यात आले असून त्याचे सिस्टिममध्ये इंटिग्रेशन देखील पूर्ण करण्यात आले आहे. यात काही बदल करण्यात येत असून हे काम येत्या आठवडाभरात पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली आहे. एसटीत प्रवास करणार्‍या प्रवाशांनी काढलेल्या तिकिटावरील ट्रिप कोड एसटीच्या अॅप्लिकेशनमध्ये टाकल्या नंतर त्या गाडीचे लोकेशन समजणार आहे. विशेष म्हणजे मार्गावरील गाड्या, त्यांची वेळ आणि त्या सर्व गाड्यांचे थांबे याची देखील माहिती मिळणार आहे.

येथे वाचा – आता सिडकोचे घर घेणे सोपे होणार, सिडकोच्या नियमात होणार मोठा बदल..!

Leave a Comment