आता सिडकोचे घर घेणे सोपे होणार, सिडकोच्या नियमात होणार मोठा बदल..!

CIDCO Housing rules : जर नवी मुंबई शहरात पती किंवा पत्नीच्या नावाने घर असेल तर सिडकोचे घर मिळत नाही, असा नियम आहे. पण, आता या नियमात बदल करण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे. या नियमामूळे सामान्यांना सिडकोचे घर घेणे अवघड होत होते. पण आता या नियमात बदल करण्याचे संकेत सामाजिक न्यायमंत्री तथा सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिले आहे.

नवी मुंबई शहरात पती किंवा पत्नीच्या नावाने घर किंवा फ्लॅट असेल तर सिडकोचे घर त्यांना मिळत नाही. कुटुंबातील सदस्य वाढल्यानंतर दुसऱ्या नवीन घराची गरज पडते, अशावेळी खासगी प्रकल्पामध्ये घर घेणे महाग ठरते. हे लक्षात घेता सिडकोच्या घराचा उत्तम पर्याय सामान्यांकडे उपलब्ध असतो. पण सिडकोच्या नियमानुसार नवी मुंबईत पती किंवा पत्नीच्या नावाने घर असेल दुसरे घर घेता येत नसल्याने अनेक जण अडचणीत येतात. त्यामुळे आता ही अट शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पूर्वीचे एक घर घेतले असेल तरी देखील आता सिडकोचे दुसरे घर घेता येणार आहे. यामुळे आता हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून या निर्णयामुळे सिडकोच्या घरांची विक्रीसुद्धा वाढेल असं जाणकार बोलत आहे.

सिडकोच्या पुढील संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतचा ठराव आणण्यात येणार आहे. सिडको विविध घटकांसाठी तब्बल 87 हजार घरे बांधणार आहे. यातील 41 हजार घरांचे बांधकाम सुरू आहे.

येथे वाचा – गूड न्यूज! मुंबईत म्हाडाची नवीन लॉटरी, ग्राहकांना मिळणार ही नवीन सुविधा..!

4 thoughts on “आता सिडकोचे घर घेणे सोपे होणार, सिडकोच्या नियमात होणार मोठा बदल..!”

Leave a Comment