ladki bahin scheme : खुशखबर! या तारखेला खात्यात येणार लाडकी बहिणीचा हप्ता, पहा नवीन तारीख..!

Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींना डिसेंबरचा 1500 रुपये हप्ता मिळाल्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता. पण आता जानेवारी महिन्याची तारीख समोर आली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी ही मोठी खुशखबर आहे. चला जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Scheme) जानेवारी महिन्याचा हप्ता येण्याची तारीख..

या तारखेला येणार जानेवारीचा हप्ता

लाडकी बहीण योजनेमुळे गरीब कुटुंबातील महिलांना मोठे आर्थिक सहाय्य मिळत आहे. योजनेतून मिळणार्‍या 1500 रुपयांमूळे महिलांची आर्थिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे ही योजना गरीब महिलांसाठी खूपच महत्वाची ठरली आहे. डिसेंबरचा हप्ता मिळाल्यानंतर जानेवारीचा हप्ता संक्रांतीपर्यंत जमा होईल असं बोललं जात होतं, पण तसं झालं नाही. आता महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी जानेवारीचा हप्ता कधी येणार याची माहिती दिली आहे. या महिन्याचा हप्ता 26 जानेवारीच्या आत खात्यात जमा होईल अशी माहिती मंत्री तटकरे यांनी दिली आहे. हा हप्ता 2100 रुपयांचा नसून तो 1500 रुपयांचाच असल्याची माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सध्यातरी हप्त्यात वाढ होणार नाहीये.

येथे वाचा – आता सिडकोचे घर घेणे सोपे होणार, सिडकोच्या नियमात होणार मोठा बदल..!

हप्त्यासाठी निधी आला

26 जानेवारीच्या आधी हप्ता खात्यात देण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी अर्थविभागाकडून निधीदेखील आमच्या विभागाकडे आला असल्याची माहिती मंत्री तटकरे यांनी दिली. जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी एकूण 3 हजार 900 कोटी एवढ्या रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

येथे वाचा – गूड न्यूज! मुंबईत म्हाडाची नवीन लॉटरी, ग्राहकांना मिळणार ही नवीन सुविधा..!

Leave a Comment