घरभाडं थेट न्यूयॉर्कच्या बरोबरीला! आता राहायचं तरी कुठे?

Apartment Rent: गेल्या काही वर्षांत शहरांमध्ये स्थलांतर करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढली आहे. नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या संधी मिळवण्यासाठी अनेकजण मोठ्या शहरांकडे धाव घेत आहेत. पण मोठ्या शहरांमध्ये पाऊल ठेवताच पहिली मोठी अडचण समोर येते, राहायला घर मिळणं! आणि मिळालंच तरी त्याचं भाडं परवडेल का, हा मोठा प्रश्न! आज एक अशीच धक्कादायक माहिती समोर आली आहे, जी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. भारतातील एका शहरातील घरभाडं थेट न्यूयॉर्कच्या बरोबरीला पोहोचलं आहे. होय, ऐकायला विचित्र वाटेल, पण हे वास्तव आहे.

हैदराबादमधील फायनान्शियल एक्सपर्ट हार्दिक जोशी यांनी नुकतीच एक माहिती शेअर केली आणि अनेकांना धक्का बसला. त्यांनी सांगितलं की बंगळूरच्या कोरमंगला भागात दोन बेडरूमच्या घराचं भाडं ७०,००० रुपये आहे. विशेष म्हणजे, न्यूयॉर्कमधील अशाच घराचं भाडं ८०,००० रुपये आहे. एकेकाळी नोकरदारांसाठी परवडणारं शहर म्हणून ओळखलं जाणारं बंगळूर आज इतकं महाग झालं आहे की, तिथे राहणं सर्वसामान्यांसाठी कठीण होऊन बसलं आहे.

गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी तीन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी, दुर्लक्ष केलं तर होईल मोठं नुकसान!

यामागचं कारण शोधायचं झालं, तर सगळ्यात मोठं कारण आहे मागणी आणि पुरवठ्यातील मोठी तफावत. दरवर्षी हजारो लोक नवीन संधीसाठी बंगळूरमध्ये स्थलांतर करत आहेत, पण त्या तुलनेत घरांची संख्या कमी आहे. त्यामुळे घरमालकांना भाड्याच्या दरात मनमानी वाढ करण्याची संधी मिळाली आहे. काही लोक हे वाढलेलं भाडं देऊन राहण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काहींनी शहर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक भागांमध्ये परिस्थिती इतकी वाईट आहे की लोकांना राहण्यासाठी लहानशा अपार्टमेंटसाठीही मोठ्या किंमती मोजाव्या लागत आहेत.

याशिवाय, बंगळूरमध्ये फक्त भाड्याचा प्रश्न नाही, तर शहरातील ट्रॅफिक, प्रदूषण आणि सार्वजनिक वाहतुकीच्या समस्या यामुळे लोक आणखीनच त्रस्त झाले आहेत. जोशी यांचा अनुभव सांगतो की, इतकी महाग किंमत मोजूनही लोकांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. रस्ते गजबजलेले, वाहतूक ठप्प, आणि साधं १० किलोमीटर अंतर पार करायलाही तासभर वेळ लागतो. म्हणजे पैशाचा भडिमार करूनही सुखसोयी मात्र तोकड्याच!

घर खरेदी करताय? अंडर कंस्ट्रक्शन की रेडी टू मूव्ह? बघा कुठे लागतो कर आणि कुठे मिळते सूट!

बंगळूरमध्ये विशेषतः हेब्बल, हेन्नूर, थानिसंद्रा या भागांमध्ये भाड्याचा दर वेगाने वाढत आहे. हे भाग विमानतळाच्या जवळ असल्याने आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स चालू असल्याने घरांचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे. व्हाईटफील्ड आणि सरजापूर रोड हे भागही आता महाग झाले आहेत, कारण हे IT हबशी जोडलेले आहेत.

एकेकाळी संधींचं शहर म्हणून ओळख असलेल्या बंगळूरची ओळख आता बदलली आहे. लोक आता पुणे, हैदराबाद, नवी मुंबई किंवा चेन्नई यांसारख्या शहरांकडे वळत आहेत, जिथे भाड्याचा बोजा कमी आहे आणि सुविधा तुलनेने चांगल्या मिळतात.

Leave a Comment