Home Loan Benefits : तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या देशात असे अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडे मोठा पैसा असताना देखील ते होम लोन (Home Loan) काढतात. मग एवढा पैसा असताना देखील ही मंडळी घरासाठी होम लोन का घेतात? असा प्रश्न आपल्याला वारंवार पडतो. पण होम लोन काढून या लोकांचे अनेक फायदे होत असतात. त्यामुळे भरपूर पैसा असताना देखील होम लोन काढलं जातं. याचे कारण वाचून तुम्हीही होम लोन काढावं असं तुम्हाला वाटेल. चला जाणून घेऊया होम लोन घेण्याचे हे फायदे..
अनेकांकडे आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण बजेट नसल्यामुळे होम लोन घ्यावे लागते. पण अनेकांना होम लोन नकोसे वाटते, होम लोन काढणे अनेकांना डोकेदुखी वाटते. आता घेतलेले होम लोन पुढील काळात फेडायचे कसे? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे लोक आहे त्या घरात राहणे पसंत करतात किंवा भाड्याच्या घरात दिवस काढतात. पण देशात असेही लोक आहेत ज्यांच्याकडे संपूर्ण रक्कम असून देखील होम लोन घेतात. चला पहा होम लोन घेण्याचा पहिला फायदा.
(1) होम लोन घेण्याचा पहिला फायदा
मित्रांनो, होम लोन घेण्याचा पहिला फायदा म्हणजे, आपण जी मालमत्ता खरेदी करत आहोत, ती विवादित मालमत्ता तर नाही ना? याची पडताळणी बँकेकडून केली जाते. बँका तसेच कोणत्याही वित्तीय संस्था होम लोन देण्यापूर्वी ती मालमत्ता विवादीत तर नाही तसेच त्यावर दुसरे लोन काही घोळ तर नाही याची काळजीपूर्वक तपासणी करतात. बँकेकडून सर्व कागदपत्रे तपासल्यानंतरच होम लोन मंजूर केले जाते. त्यामुळे आपण घेतलेली मालमत्ता कशी आहे हे आपल्याला समजते.
(2) होम लोन घेण्याचा दुसरा फायदा
होम लोन घेण्याचा दुसरा मोठा फायदा असा की यातून कर वाचवता येतो. यामुळेच आयकर भरत असलेले लोक कर वाचवण्यासाठी होम लोन घेणे पसंत करतात. होम लोनमूळे करदात्यांना आपला कर वाचवता येतो. मित्रांनो, आयकर अधिनियमाच्या कलम 24(B) च्या अंतर्गत प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये 2 लाख रुपयांची व्याज सवलत मिळत असते. म्हणजे होम लोनवर जे व्याज आकारण्यात येते त्यावर कमाल 2 लाख रुपयांची सवलत मिळत असते. आणि कलम 80(C) अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळत असते.
येथे वाचा – खुशखबर! एसटीत मिळणार नवीन सुविधा, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा..!
(3) होम लोन घेण्याचा तिसरा फायदा
होम लोन घेण्याचा तिसरा मोठा फायदा असा की इतर लोनपेक्षा होम लोनवरील व्याजदर खूपच स्वस्त असते. पर्सनल लोन (Personal Loan) आणि होम लोनच्या व्याजदराची तुलना केली तर यात मोठी तफावत दिसून येते. जर भविष्य काळात महागाईचे प्रमाण कमी झाले तर होम लोन वरील व्याजदर पण कमी होते. याचा होम लोन घेणाऱ्यांना मोठा फायदा होत असतो.
येथे वाचा – खुशखबर! या तारखेला खात्यात येणार लाडकी बहिणीचा हप्ता, पहा नवीन तारीख..!
(4) होम लोन घेण्याचा चौथा फायदा
होम लोन घेण्याचा चौथा मोठा फायदा म्हणजे होम लोनवर टॉप-अप लोन मिळत असते. जर तुम्ही जुने घर विकत घेतले आणि तुम्हाला त्या जुन्या घराची डागडुजी करायची किंवा घराचे रिनोवेशन करायचे आहे अशा परिस्थितीत तुम्हाला टॉप अप होम लोन घेता येते. हे लोन घेऊन तुम्ही खर्च भागवू शकता. त्यामुळे होम लोन घेण्याचे असे अनेक फायदे आहेत.