आज लोनवर घर घ्यावे की भाड्याने रहावे? एक्सपर्टचं ऐकाल तर फायद्यात राहाल..!

Home Loan vs rent : जेव्हा घराबद्दल चर्चा होते तेव्हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे घर विकत घ्यावे की भाड्याने? या प्रश्नाने अनेकांच्या डोक्यात गोंधळ निर्माण होतो. पण आज हा गोंधळ दूर होऊन तुम्हाला योग्य मार्ग मिळणार आहे. घर घेण्याचा निर्णय हा आयुष्यातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय समजला जातो. त्यामुळे हा निर्णय खूपच काळजीपूर्वक घेतला जातो. मित्रांनो सध्या, घर विकत घ्यावी की भाड्याने राहावे? अशा गोंधळात जर तुम्ही अडकला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

मित्रांनो, 48 वर्षांचे राजेश एका एज्युकेशन सोल्युशन कंपनीमध्ये सीनियर व्हॉइस प्रेसिडेंट म्हणून काम करतात. वर्ष 2014 मध्ये ते बेंगलोर वरून मुंबईमध्ये आले. सुरुवातीच्या काळात त्यांनी भाड्याने राहणे योग्य समजले. पण प्रत्येक महिन्याला 35 हजार रुपये घर भाडे त्यांना भरावे लागत असल्याचे पाहून त्यांनी मुंबईत तब्बल 60 लाख रुपयांचा एक फ्लॅट खरेदी केला. त्यासाठी त्यांना प्रत्येक महिन्याला 60 हजार रुपये ईएमआय (EMI) भरावी लागत आहे.

तर, वडोदरा येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणारा 38 वर्षीय ऋषी आर्य मागच्या दहा वर्षापासून भाड्याच्या घरात राहत आहे. त्यांचं म्हणणं आहे की “आता घर विकत घेणं म्हणजे पेमेंट मधील मोठा हिस्सा ईएमआय मध्ये भरावा लागेल. त्यामुळे आता 18000 रुपये भाडे भरणे योग्य वाटत आहे, “

प्रश्न पडतो की कोणता निर्णय योग्य आहे?

तसेच रेसिडेन्शिअल ट्रांजेक्शन सर्विसेस कोलियर्स इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर रविशंकर सिंग या विषयावर बोलताना म्हणतात की घर खरेदी करणे आणि भाड्याने घेणे यातील दीर्घकालीन फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. बँक कर्जांवरील व्याजदर बदलत राहतात, ज्यामुळे ईएमआयचा भार वाढू किंवा कमी होऊ शकतो.

भारतातील भाडे उत्पन्न (भाडे विरुद्ध मालमत्तेची किंमत यांचे प्रमाण) 2.5 – 4.5% च्या दरम्यान असते, तर गृहकर्जाचे व्याजदर 8.1% किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतात. घर खरेदी केल्याने दीर्घकाळासाठी स्थिरता मिळत असते, तर भाड्याने घर घेऊन राहिल्यास लवचिकता मिळते.

घर खरेदी करण्याचे फायदा असा की तुम्हाला दीर्घकाळ स्थिरता मिळते म्हणजे एकाच ठिकाणी राहण्याची सोय, तर भाड्याने राहिल्यास लवचिकता मिळते म्हणजेच ठरलेल्या वेळेत दुसरीकडे जाण्याची सोय उपलब्ध होते.
या माहितीच्या आधारावर, तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि आर्थिक परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकता की घर खरेदी करणे तुमच्यासाठी योग्य आहे की भाड्याने राहणे.

येथे वाचा – सिडकोच्या नवीन सोडतीत मोठी संधी! ‘या’ लोकांना अर्जाशिवाय मिळणार घर?

घर खरेदी करण्याचे फायदे आणि नुकसान

घर खरेदी करण्याचे फायदे : घर खरेदी करण्याचा फायदा असा की तुम्हाला कायमस्वरूपी स्थिरता आणि सुरक्षा मिळते तसेच भविष्यात प्रॉपर्टी ची किंमत वाढल्यास त्याचा मोठा फायदा होतो. त्यातच तुम्हाला भाड्याची चिंता सतावत नाही.

घर खरेदी करण्याचे नुकसान : घर खरेदी करण्याचे सर्वात मोठे नुकसान म्हणजे खूप मोठी डाऊन पेमेंट आणि दर महिन्याला भरावा लागणारा मोठा ईएमआय (EMI), जर तुम्हाला काही कारणास्तव शहर बदलायचे असेल तर तुम्हाला अडचणी येतात.

येथे वाचा – मुंबईत फक्त साडेदहा लाखांत घर घेण्याची संधी; मुंबई बाहेर राहणाऱ्यांना प्राधान्य..

भाड्याने राहण्याचे फायदे आणि नुकसान

भाड्याने राहण्याचे फायदे : कमी खर्चात राहू शकतात, EMI सारखी मोठी पेमेंट दर महिन्याला भरण्याची गरज नाही. मला वाटेल तेव्हा जॉब तसेच शहर बदलू शकतात. महत्त्वाचं म्हणजे घरी पडून असलेल्या पैशांना अन्य ठिकाणी गुंतवण्याची संधी मिळते.

भाड्याने राहण्याचे नुकसान : भाड्याने राहण्याचे सर्वात मोठे नुकसान म्हणजे दरवर्षी वाढणारे भाडे. तसेच घरात मालक म्हणून राहण्याचा अनुभव येत नाही.

काय म्हणतात एक्सपर्ट?

झेनिथ फिनसर्व्हचे संस्थापक अनुज केसरवानी यांनी एक उदाहरण दिले की “राजने 2016 मध्ये 43 लाख रुपयांचे घर खरेदी केले आणि 20 वर्षांच्या कर्जावर 8.5% व्याज भरले. एकूण खर्च (व्याजासहित) 80 लाख रुपये झाला. तर दुसरीकडे, विजयने तेच घर खरेदी करण्याऐवजी 25,000 रुपये प्रति महिना भाडे दिले आणि वाचलेले पैसे म्युच्युअल फंडात (SIP) 12% च्या वार्षिक परताव्याने गुंतवले. याचा परिणाम असा झाला की 13 वर्षे 5 महिन्यातच विजय जवळ एवढी रक्कम झाली की तो घर कॅश पैशांमध्ये खरेदी करू शकतो. तर त्याचवेळी राज ईएमआय (EMI) भरत असेल. म्हणजेच या ठिकाणी विजयसाठी त्याचा निर्णय योग्य झाला आहे.

घर खरेदी करावे की भाड्याने घ्यावे? हे आहे योग्य उत्तर

जर तुम्ही एखाद्या शहरात कायमस्वरूपी राहण्याचा विचार करत असाल आणि ईएमआयचा (EMI) भार उचलू शकत असाल, तर घर खरेदी करणे हा तुमच्यासाठी एक चांगला निर्णय असू शकतो. दुसरीकडे, जर तुम्ही नोकरी बदलायची असेल किंवा दुसऱ्या शहरात राहण्याचे नियोजन करत असाल, तर भाड्याने राहणे जास्त फायद्याचे ठरेल. शेवटी, हा निर्णय पूर्णपणे तुमच्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतो.”

Leave a Comment