Cidco Housing Lottery : शिवजयंतीच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेची सोडत काढण्यात आली. या सोडतीत 1881 अर्जदारांना त्यांच्या आवडीचे घर मिळाले नाही. त्यांना सिडकोने आणखी एक संधी दिली आहे. त्यानुसार आता या 1881 अर्जदारांना पुढील सोडतीत अर्जशुल्क भरण्याची आवश्यकता नाही. सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शान्तनू गोयल यांनी सांगितले की, या अर्जदारांना नव्या सोडतीत सहभागी होण्यासाठी पुन्हा अर्ज करण्याची आणि शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे आता या अर्जदारांना पुन्हा सोडतीत सहभागी होण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. या निर्णयामुळे ज्या अर्जदारांना पहिल्या सोडतीत घर मिळाले नाही, त्यांना आता कोणताही अतिरिक्त खर्च न करता पुढील सोडतीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
सिडकोची मोठी गृहनिर्माण सोडत : तब्बल 19,518 जणांना मिळालं आपलं हक्काचं घर
सिडको महामंडळाने (Cidco) मागील चार महिन्यांपासून 25,723 घरांसाठी सोडत प्रक्रिया राबवली होती. या सोडतीत 19,518 अर्जदारांना घरं मिळाली आहेत, असं सिडकोनं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे या सोडतीत अनेक अर्जदारांना त्यांच्या पसंतीचं घर मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या सोडतीत 21,399 एवढ्या अर्जदारांकडून अनामत शुल्क भरण्यात आले होते. सुरुवातीस 1 लाख 60 हजार अर्जदारांनी या सोडतीत सहभाग घेण्याची इच्छा दर्शवली होती. पण घरांच्या किमती आणि अजून इतर कारणांमुळे फक्त 21,399 अर्जदारांनीच अर्ज भरले.
येथे वाचा – मुंबईत फक्त साडेदहा लाखांत घर घेण्याची संधी; मुंबई बाहेर राहणाऱ्यांना प्राधान्य..
विशेष म्हणजे राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने (19,518 अर्जदारांना) घरं मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. सिडकोने एवढ्या मोठ्या प्रमाणात घरांची सोडत (Housing Lottery) काढून अनेक कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली आहे.
सिडकोच्या घरांच्या सोडतीचा निकाल जाहीर झाला आणि हजारो अर्जदारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. सिडकोची ही सोडत एकूण चार वेगवेगळ्या टप्प्यात पार पडली. पहिल्या टप्प्यात 12,420 एवढ्या अर्जदारांना त्यांच्या पसंतीचे घर मिळाले. दुसऱ्या टप्प्यात 613 इतक्या अर्जदारांना तर तिसऱ्या टप्प्यात 404 अर्जदारांना त्यांच्या निवडलेल्या पर्यायानुसार घरं मिळाली.
मुंबईत फक्त 12 लाखात घर; त्यातही 3 लाखांपर्यंत सबसिडी, येथे क्लिक करून वाचा बातमी..
महत्त्वाचं म्हणजे या सोडतील सिडको कडून चौथ्या टप्प्याचा एक वेगळा पर्याय देण्यात आला होता. यात अर्जदारांचे पहिले तीन पर्याय संपल्यानंतर त्यांच्यासाठी ऑनलाइन पद्धतीने चौथा टप्पा पार पडला. या चौथ्या टप्प्यात तब्बल 6,081 अर्जदारांना ऑनलाइन प्रणालीद्वारे घरं मिळाली. सिडकोचे अधिकारी आता या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत की ऑनलाइन पद्धतीने निवडलेली घरं अर्जदारांना आवडतात की नाही.