मुंबईत फक्त साडेदहा लाखांत घर घेण्याची संधी; मुंबई बाहेर राहणाऱ्यांना प्राधान्य..

Mumbai Housing : मुंबईसारख्या मोठ्या महानगरात आपले स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न कित्येक जण पाहत असतात. सतत वाढत असलेल्या घरभाड्यांच्या आणि महागड्या घरांच्या जाळ्यात हक्काचे घर घेण्याचे स्वप्न अडकून जाते. पण आता. सरकारच्या वेगवेगळ्या गृह योजना (Housing Schemes) आणि परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी घर घेणे शक्य झाले आहे. म्हाडा (MHADA), प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) आणि सिडको (CIDCO) यांसारख्या योजना सामान्य नागरिकांना स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी देत आहे. आर्थिक राजधानी मुंबईत परवडणाऱ्या घरांची (affordable flats) मागणी दिवसेंदिवस वाढत असून ही मागणी सरकारी योजना आणि परवडणाऱ्या प्रोजेक्ट मधून पूर्ण होत आहे. अलीकडेच मुंबईत फक्त साडे दहा लाखात घर घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ही घरे नेमकी कोणाला मिळणार? आणि या घरांचे लोकेशन कुठे आहे? याची माहिती सविस्तर जाणून घेऊया.

मुंबईत यांना मिळणार साडे दहा लाखात घर

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRD) माहुलमध्ये बांधलेल्या 13 हजार सदनिका (Flats) अजूनही रिकाम्या आहेत. या सदनिका प्रकल्पबाधितांसाठी बांधल्या होत्या, पण काही कारणांमुळे प्रकल्पबाधित येथे राहायला आलेले नाहीत. त्यामुळे या सदनिकांची देखभाल करणे महापालिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यातच, या सदनिकांमध्ये अनेकवेळा घुसखोरी झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या समस्येवर उपाय म्हणून, महापालिकेने या सदनिका कर्मचाऱ्यांसाठी विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे कर्मचारी आता या सदनिका मालकी तत्त्वावर खरेदी करू शकणार आहेत. प्रत्येक सदनिकेची किंमत सुमारे साडेदहा लाख रुपये (अधिक मुद्रांक शुल्क) असेल.

या निर्णयामुळे महापालिकेला मुख्य दोन फायदे होणार आहेत. एक म्हणजे, या सदनिकांची देखभाल करण्याची जबाबदारी कमी होईल आणि दुसरे म्हणजे, त्यांची विक्री करून महसूल मिळेल. येत्या काही दिवसांत या योजनेची अंतिम घोषणा केली जाईल.

मुंबईत फक्त 12 लाखात घर; त्यातही 3 लाखांपर्यंत सबसिडी, येथे क्लिक करून वाचा बातमी..

एमएमआरडीएने माहुलगावात प्रकल्पबाधितांसाठी इमारती बांधल्या आणि त्यातील सदनिका महापालिकेकडे हस्तांतरित केल्या. महापालिकेने तिथे विकास प्रकल्प आणि सेवा-सुविधा पुरवल्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींमधील भाडेकरूंचेही पुनर्वसन केले. पण माहुलची जागा पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य नसल्याने आणि रासायनिक प्रकल्पांमुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रकल्पबाधितांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने या इमारतींमध्ये पुनर्वसन न करण्याचे आदेश दिले. त्यामुळे, पुनर्वसन होऊनही महापालिकेच्या 13 हजार सदनिका आजही रिक्त आहेत.

त्यामुळे महापालिका प्रशासनासमोर रिक्त सदनिका कशा हाताळायच्या हा प्रश्न उभा राहिला आहे. या सदनिकांमध्ये अनधिकृत घुसखोरी होण्याची शक्यता मोठी असल्याने, त्यांचा लाभ महापालिका कर्मचाऱ्यांनाच देऊन महसूल वाढवण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या सदनिकांची किंमत साडेदहा लाख रुपये निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये मुद्रांक शुल्क समाविष्ट नाही. महापालिका वसाहत म्हणून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे या सदनिकांच्या विक्रीचा निर्णय घेतला गेला आहे. याअंतर्गत, प्रत्येक कर्मचारी दोन सदनिका खरेदी करू शकतो अशी सवलतही दिली जाणार आहे.

येथे वाचा – मुंबईत म्हाडाचा 1BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध, तुम्हाला घ्यायचा का? पहा घराचे भाडे आणि लोकेशन..!

अलीकडेच, माहुलमधील रखडलेल्या सदनिकांच्या विक्रीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महापालिकेचे जे कर्मचारी मुंबईबाहेर राहतात, त्यांना या सदनिका खरेदी करण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर, जर सदनिका शिल्लक राहिल्या, तर मुंबईत स्वतःचे घर (House in Mumbai) असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. या संदर्भात लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. येत्या मंगळवारी महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांच्यासोबत एक बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असून त्यानंतर याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या सदनिकांच्या विक्रीतून महापालिकेला सुमारे 1300 ते 1400 कोटी एवढे रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, या सदनिकांच्या देखभालीवर आणि दुरुस्तीवर होणारा मोठा खर्चही वाचणार आहे.

Leave a Comment