Mhada Housing Scheme : मुंबईत घरांचे दर दिवसेंदिवस आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे मुंबई शहर व आसपासच्या भागात घर खरेदी करणे सामान्यांसाठी दिवसेंदिवस महागडे होत आहे. मुंबईत अशी परिस्थिती असतानाही म्हाडामूळे आपल्याला घर मिळेल अशी आशा सामान्यांना लागून असते. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा (Mhada) सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात घरं उपलब्ध करुन देते. म्हाडाच्या योजनेसाठी (Mhada Housing Scheme) अनेक लोक अर्ज करतात. अनेक लोकांचे घराचे स्वप्न म्हाडा योजनेमुळे पूर्ण होते. त्यात आता म्हाडाची घरे विकत न घेता मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईत विकत न घेता मिळणार म्हाडाचे घर
पुढील पाच वर्षांत मुंबईत अडीच लाख नवीन घरे बांधण्याची घोषणा म्हाडाकडून करण्यात आली आहे. तसेच परवडणाऱ्या घरांच्या किमती तब्बल 30 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय देखील म्हाडाकडून घेतला जाऊ शकतो. पण अनेक कारणांमुळे तसेच कादपत्रांची पूर्तता झाली नसल्यास बर्याच जणांना म्हाडाचे घरं खरेदी करता येत नाही.
मुंबईत आपले स्वत:चे घर नसणारे तसेच शिक्षण व कामासाठी मुंबईत राहणाऱ्या लोकांना भाड्याने घर घ्यावे लागते. आता अशा लोकांना म्हाडाकडून मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आता म्हाडा मुंबईत भाड्याने घरे उपल्बध करुन देण्याची तयारी करत आहे.
म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून यासंदर्भात माहिती मिळाली आहे. विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या महिलांना म्हाडाची घरं भाड्याने मिळणार आहेत. त्यामुळे आता मुंबईत म्हाडाचे घर विकत न घेता मिळणार आहे.
येथे वाचा – भरपूर पैसा असतानाही लोक घरासाठी होम लोन का घेतात? कारण वाचून तुम्हीही काढाल लोन..!
म्हाडा उभारणार 8 लाख घरे
केंद्र सरकारच्या निती आयोगाने मुंबई महानगर प्रदेशाची ग्रोथ हब म्हणून निवड केली आहे. पुढील पाच वर्षात याच भागात 30 लाखापेक्षा जास्त घरांची बांधणी करण्याचा मानस ठेवण्यात आला आहे. यापैकी म्हाडाकडून 8 लाख घरांची उभारणी करण्यात येणार आहे.
येथे वाचा – खुशखबर! एसटीत मिळणार नवीन सुविधा, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा..!