पुणेकरांनो! बजेट तयार ठेवा; आता मिळणार म्हाडाचे घर, आज येणार यादी..!

Mhada Housing Scheme : मुंबई तसेच पुण्यात म्हाडाची योजना अत्यंत लोकप्रिय आहे. मुंबई-पुण्यातील लहान मोठ्यांना म्हाडा योजनेबद्दल माहिती असते. कारण घर घेताना म्हाडाचे घर (Mhada Flat) मिळावे असे अनेकांना वाटत असते. म्हाडाची घरे खासगी बिल्डरांच्या घरांपेक्षा स्वस्त असतात. त्यामुळे म्हाडाच्या घरांना परवडणारी घरे (Affordable Flats) देखील म्हटलं जातं. म्हाडाची योजना वर्षातून एक ते दोन वेळा येत असल्याने अनेकांना म्हाडा योजनेची महिनोंमहिने प्रतीक्षा करावी लागते. पण आता पुणेकरांचे म्हाडाचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडा घरांच्या विजेत्यांची यादी येण्याची तारीख आता समोर आली आहे.

म्हाडाच्या पुणे मंडळाकडून पुणे, पिंपरी चिंचवड व सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील (Housing Scheme) तब्बल 3 हजार 662 घरांची सोडत आज म्हणजेच 29 जानेवारीला दुपारी 1 वाजता पुण्यातील जिल्हा परिषद सभागृहामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढली जाणार आहे. अर्जदारांना हा निकाल सभागृहात एलईडी स्क्रीनवर पाहता येणार आहे. तसेच हा निकाल ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरी बसून देखील पाहण्याची व्यवस्था आहे. या योजनेसाठी 71,642 अर्ज आले आहेत.

येथे वाचा – घरासाठी कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कर्जाचं पुढं काय होतं? हे तुम्हाला माहित आहे का?

आज येणार यादी

घरासाठी विजेते ठरलेल्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या वेबसाईटवर सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विजेत्यांना आपल्या मोबाईलवर एसएमएसच्या (SMS) माध्यमातून विजेता ठरल्याबाबतची माहिती कळविली जाणार आहे. तसेच विजेता ठरलेल्या अर्जदारास सूचना पत्र पाठविण्यात येणार असून तरतुदींची पूर्तता झाल्यानंतर विजेत्यांना तात्पुरते देकार पत्र पाठविण्यात येणार आहे.

येथे वाचा – खुशखबर! आता मुंबईत घर खरेदी करताना वाचवा 20 ते 25 लाख, प्रॉपर्टी डीलरने सांगितली एक सोपी ट्रिक..!

2 thoughts on “पुणेकरांनो! बजेट तयार ठेवा; आता मिळणार म्हाडाचे घर, आज येणार यादी..!”

Leave a Comment