Mumbai Property : मुंबईत घर घेण्यासाठी अनेक लोक धडपड करत असतात. मुंबईत स्वतःचे घर असणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. काही लोक राहण्यासाठी घर घेतात तर काही इन्व्हेस्टमेंट म्हणून घर खरेदी करतात. मुंबईत आज खरेदी केलेली प्रॉपर्टी पुढच्या काही वर्षात दुप्पट रक्कम देऊन जाते. त्यामुळे मुंबईत खरेदी केलेल्या घरापासून भविष्यात मोठा पैसा मिळण्याची दाट शक्यता असते. मुंबईत मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असल्याने अनेकांना तिथले रहिवाशी व्हायचे आहे. त्यासाठी सर्वात अगोदर हक्काचे घर शोधले जाते. मुंबईत घराचे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे दर आहेत. पण आता मुंबईत घर खरेदी करताना लाखो रुपये वाचवता येणार आहे. एक प्रॉपर्टी डीलरने एक सोपी ट्रिक सांगितली आहे. याचा फायदा घर खरेदी करत असताना नक्कीच होणार आहे (Save 20 to 25 lakhs while buying a house in Mumbai).
प्रॉपर्टी डीलरने सांगितली ही सोपी ट्रिक
सध्याच्या काळात मध्यम वर्ग मुंबईत घर खरेदी करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. पण प्रॉपर्टी डीलर किशोर भूसा यांनी घर खरेदी करताना लाखो रुपये वाचतील अशी ट्रिक सांगितली आहे. किशोर भूसा यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईजवळ असलेल्या नायगाव-वसई येथे घर खरेदी करून 20 ते 25 लाख रुपये वाचवू शकता. तसेच येथील बिल्डिंगमधे अशा सुविधा मिळतील ज्या मुंबईत मिळत नाही. जसे की गाडी पार्किंगची सुविधा. काही वर्षांपासून नायगाव-वसई या भागात प्रॉपर्टी घेणार्यांची संख्या वाढली आहे. कारण या भागात घराचे भाव कमी आहे, तसेच शांत वातावरण याठिकाणी आहे.
स्वस्तात खरेदी करा 1BHK आणि 2BHK घर
मुंबईजवळ असलेल्या नायगाव-वसई या भागात खूपच कमी किमतीत 1BHK आणि 2BHK घर खरेदी करता येणार आहे. जर तुम्ही मुंबई शहरात घर खरेदी करायला गेले तर तिथे कोटीच्या घरात किमती आहे. तसेच घर भाडे देखील खूप आहे. त्यामुळे मुंबईजवळ असलेल्या नायगाव-वसईमध्ये घर खरेदी करण्याचा एक शानदार पर्याय सामान्यांकडे उपलब्ध आहे.
येथे वाचा – अवघ्या 15 लाखात नवी मुंबईत परवडणारी घरे; स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी, पहा बातमी..!