Home Loan : सध्या नवीन घर घेण्याचा किंवा बांधण्याचा ट्रेंड सुरू आहे. जिकडेतिकडे घरांचेच कामे सुरू असल्याचं पाहायला मिळतं. खेडेपाडेही यात मागे नाही, खेड्यापाड्यात मोठ-मोठी घरे उभी राहत आहे. याचे कारण म्हणजे बँकां मोठ्या प्रमाणात होम लोन (Home Loan) वाटप करताना दिसतात. घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी एकदाच एवढा पैसा नसल्याने अनेकांना होम लोन घ्यावेच लागते. पण होम लोन घेतलेल्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर होम लोनचे पुढे काय होईल, बॅंका काय करतात? असे प्रश्न अनेकांना पडत असतात (How bank recover bank loan after loan taker died).
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास काय होते?
जर कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर बँकेचे पैसे बुडत असेल असंही अनेकांना वाटतं. पण तसं काहीच नाही. कर्ज घेणार्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर बँका सर्वांत अगोदर को-अॅप्लिकंट सोबत संपर्क करतात. जर को-अॅप्लिकंटने कर्जाची फेड केली नाही तर बँका गॅरंटर सोबत संपर्क करतात. तसेच बॅंका मृत व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीला कर्ज भरण्यास सांगतात. जर कुटुंबातील व्यक्तीने कर्ज भरण्यास नकार दिला किंवा चर्चेतून प्रश्न सुटत नसेल तर बँकां कायदेशीर मार्गाचा अवलंब करून कर्जाची वसुली करू शकतात.
येथे वाचा – नवीन फ्लॅट घ्यावा की जुना? तज्ञांनी स्पष्टचं सांगितलं..!
हे सगळे पर्याय वापरूनही कर्जाची परतफेड होत नसेल तर बँका मृत कर्जदाराची मालमत्ता (Property) जप्त करू शकतात. आणि त्या जप्त केलेल्या संपत्तीची निलामी केली जाते आणि त्यातून कर्जाचा पैसा वसूल केला जातो.
येथे वाचा – खुशखबर! आता मुंबईत घर खरेदी करताना वाचवा 20 ते 25 लाख, प्रॉपर्टी डीलरने सांगितली एक सोपी ट्रिक..!