आनंदाची बातमी! शिंदेंनी केली एक लाख घरांची घोषणा; लाखो लोकांना मिळणार म्हाडाचे घर.!

मुंबई : मोठ्या शहरांमध्ये घरांचे दर प्रचंड वाढल्याने सामान्य लोकांना सरकारी योजनेतून घर मिळावे यासाठी सरकार नेहमी प्रयत्न करते. आजचं उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडाच्या घराबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे लाखो लोकांचे शहरात परवडणारे म्हाडाचे घर (Mhada Flat) घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटीबद्ध असून पुढील दोन वर्षात म्हाडा योजनेतून राज्यात सुमारे एक लाख घरांची उभारणी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. तसेच यासाठी लवकरच गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यामुळे आता म्हाडाचे घर घेण्याची संधी लाखो लोकांना मिळणार आहे.

या गृहनिर्माण धोरणाचा फायदा सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, काम करणाऱ्या महिला आणि विद्यार्थ्यांना होणार आहे. यांच्यासाठी विविध ठिकाणी वसतिगृह बांधले जाणार आहे. झोपडपट्टी पुनर्विकास आणि रखडून पडलेले प्रकल्प मार्गी लावले जाणार आहे. यातून मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होणार आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांमध्ये समूह पुनर्विकास योजनेतून योजनाबद्ध गृहनिर्मिती करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती शिंदेंकडून मिळाली आहे. म्हाडा सोडतीच्या कार्यक्रमात शिंदेंनी ही माहिती दिली आहे.

येथे वाचा – भरपूर पैसा असतानाही लोक घरासाठी होम लोन का घेतात? कारण वाचून तुम्हीही काढाल लोन..!

Leave a Comment