Housing Scheme Mumbai : ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थी यांच्यासाठी सरकार अनेक योजना आणत असते. आता म्हाडानेही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी पावले उचलली आहेत. म्हाडाच्या घरांवर लोकांचा विश्वास वाढला असल्याने म्हाडाचे नवीन धोरण आणण्यात येत आहे. यातून सर्वसामान्य लोकांना परडवणारी घरे (affordable flats), महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची उभारणी करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात दिली. त्यामुळे आता म्हाडाच्या नवीन धोरणातून सामान्य लोकांना हक्काचे घर मिळणार आहे. मुंबईच्या बाहेर फेकले गेलेल्यांना पुन्हा मुंबईत आणण्यासाठी मुंबईतील रखडून पडलेले गृहप्रकल्प टप्प्याटप्प्याने मार्गी लावणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
पुणे मंडळाची संगणकीय सोडत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शिंदेंच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडली. ज्या नागरिकांना घरे मिळणार आहेत त्यांच्यासाठी आणि सरकार म्हणून आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे, असही शिंदे म्हणाले. घर घेण्याचे प्रत्येकजण स्वप्न पाहत असतो. पण घरे महागडी असल्यामुळे सर्वसामान्यांना ती परवडत नाही. त्यामुळे म्हाडाकडून बुधवारी 3 हजार 662 लोकांना घरे देण्यात आली आहे. पण या घरांसाठी 93 हजार 662 अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये 71 हजारांपेक्षा जास्त लोकांकडून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. अशीही माहिती देण्यात आली आहे.
प्रत्येकाला मिळणार मुंबईत घर (Mhada flats in Mumbai)
मागच्या दीड वर्षांमध्ये म्हाडा कडून तब्बल 13 हजार घरे लोकांना देण्यात आली आहे. म्हाडाच्या घरांवर (Mhada flats) लोकांचा विश्वास वाढत असल्यामुळे म्हाडाचे नवे धोरण लवकरच आणले जाणार आहे. चेंबूरमध्ये 17 हजार घरांचा प्रकल्प (Housing Project) एसआरए आणि एमएमआरडीकडून पूर्ण करण्यात येत आहे. मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच मुंबईत प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न होत आहे. आशियात सर्वात मोठा असलेल्या क्लस्टरला ठाण्यात मान्यता देण्यात आली आहे. तसेच ठाण्यामध्ये 4 ते 5 ठिकाणी क्लस्टरचे काम सुरू असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
येथे वाचा – महिलांसाठी मोठी संधी; ठाण्यात घर खरेदीत मिळणार मोठी सवलत, पहा योजनेबद्दल माहिती..!
I want mahada room
I want mahada room plz procedure sanga