महिलांसाठी मोठी संधी; ठाण्यात घर खरेदीत मिळणार मोठी सवलत, पहा योजनेबद्दल माहिती..!

Housing Scheme for Women : महिलांसाठी अनेक योजना आणल्या जातात. ठिकठिकाणी महिलांना सवलती दिल्या जातात. त्यामुळे महिलांना मोठा आर्थिक आधार मिळतो. अलीकडेच ठाण्यातील बिल्डरांनी महिलांसाठी विशेष सवलत योजना (Women Scheme) आणली आहे. आता या योजनेचा फायदा महिलांना घर खरेदी करताना होणार आहे. महिलांना या सवलतीचा लाभ केव्हा व कसा मिळणार याची माहिती जाणून घेऊया.

राज्य सरकार महिलांसाठी ‘लाडकी बहिण योजना’ राबवत असतानाच आता ठाण्यातील बिल्डरांकडून देखील घर खरेदी करणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहिण विशेष सवलत योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाण्यात 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान मालमत्ता प्रदर्श (Property Exhibition Thane) होणार असून या काळात घर खरेदी करणाऱ्या महिलांनी घराची 20 टक्के एवढी रक्कम भरल्यास, त्यांना बिल्डरांकडून विशेष सवलत देण्यात येणार आहे. या मालमत्ता प्रदर्शनात 100 पेक्षा जास्त गृहप्रकल्पांमधील घरे विक्रिसाठी ठेवली जाणार आहेत. यात विविध किंमतीची घरे उपलब्ध असणार आहेत.

ठाण्यात कुठे असणार मालमत्ता प्रदर्शन?

ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड गार्डन मैदानावर यंदाचे मालमत्ता प्रदर्शन (Property Exhibition) भरविले जाणार आहे. हे प्रॉपर्टी प्रदर्शन 7 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मालमत्ता प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. या प्रदर्शनात 30 लाखांपासून ते कोटीपर्यंत घरांच्या किंमती असणार आहेत. ठाण्यात होत असलेल्या या मालमत्ता प्रदर्शनाची माहिती क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे’ चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

येथे वाचा – मुंबईत म्हाडाचा 1BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध, तुम्हाला घ्यायचा का? पहा घराचे भाडे आणि लोकेशन..!

Leave a Comment