Home Loan : होम लोन स्वस्त झाले, होम लोन धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आरबीआयने 0.25% व्याजदर कपात केली असून, त्यामुळे होम लोनच्या ईएमआयमध्ये (EMI) घट झाली आहे. 20, 30 आणि 50 लाखांच्या लोनवर महिन्याला चांगलीच बचत होणार आहे. त्यामुळे आता होम लोन घेणाऱ्यांची बल्लेबल्ले नक्कीच होणार आहेत. या निर्णयानंतर जुन्या-नव्या कर्जदारांना कसा फायदा होणार? आणि तुमच्या लोनवर किती फायदा होणार? चला जाणून घेऊया सविस्तर माहिती (Home loan has become cheaper)..
20 लाखाच्या लोन वर किती होणार बचत?
मित्रांनो, जर कोणी 20 लाख रुपयांचे होम लोन (Home Loan) घेतले असेल आणि त्यावरील व्याजदर 8.5 टक्के असेल, तसेच लोनचा कालावधी 20 वर्षांचा असेल, तर त्याचा मासिक हप्ता (EMI) 17 हजार 356 रुपये एवढा असेल. आता रिझर्व्ह बँकेने (RBI) 25 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.25 टक्के एवढी व्याजदरात कपात केली आहे.
या व्याजदर कपातीनंतर लोनचा नवा व्याजदर 8.25 टक्के एवढा होईल. त्यामुळे आता 20 लाख रुपयांच्या लोनसाठी मासिक हप्ता (EMI) 17,041 रुपये राहील. यामुळे मासिक (महिन्याला) 315 रुपयांची नक्कीच बचत होईल. जरी ही बचत कमी वाटत असली, तरी 20 वर्षांच्या कालावधीत ही बचत मोठी ठरू शकते.
30 लाखाच्या लोन वर किती होणार बचत?
जर कोणी 30 लाख रुपयांचे होम लोन (Home Loan) 8.50 टक्के या व्याजदराने २० वर्षांसाठी घेतले असेल, तर त्याचा मासिक हप्ता (EMI) 26 हजार 35 रुपये एवढा होता. पण आता आरबीआयच्या व्याजदर कपातीनंतर हा हप्ता कमी होऊन 25 हजार 562 रुपये एवढा होईल. त्यामुळे दर महिन्याला तुमची 473 रुपयांची बचत होणार आहे, जी दीर्घकालीन आर्थिक फायद्यासाठी खूपच फायद्याची ठरू शकते.
येथे वाचा – मुंबईत म्हाडाचा 1BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध, तुम्हाला घ्यायचा का? पहा घराचे भाडे आणि लोकेशन..!
30 लाखाच्या लोनसाठी एवढी होणार बचत
मित्रांनो, 50 लाख रुपयांचे होम लोन 8.50 टक्के या व्याजदराने 20 वर्षांसाठी घेतल्यास, मासिक हप्ता (EMI) 43 हजार 391 रुपये येत होता. पण आता आरबीआयने 25 बेस पॉइंट्सने (0.25%) व्याजदर कपात केल्यानंतर हा हप्ता कमी होऊन 42 हजार 603 रुपये एवढा होईल. यामुळे आता दर महिन्याला 788 रुपयांची बचत होणार आहे, जी दीर्घकाळासाठी आर्थिक फायद्याची ठरू शकते.
5 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक पार पडली. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा करत असताना संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात 0.25 टक्के कपात करण्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे बँकांसाठी कर्ज देणे स्वस्त झाले असून त्यामुळे नवीन आणि जुन्या कर्जदारांना लवकरच याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2020 मध्ये आरबीआयकडून रेपो दरात कपात करण्यात आली होती.