अवघ्या 15 लाखात नवी मुंबईत परवडणारी घरे; स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी, पहा बातमी..!

Navi Mumbai Property Exhibition : झपाट्याने विकसित होणार्‍या नवी मुंबईत अनेकांना घरे घ्यायची आहे. या भागात भरपूर सोईसुविधा आणि नौकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने इथे अनेकांना हक्काचे घर खरेदी करायचे आहे. पण आपल्या बजेटमध्ये घर (budget friendly flat) मिळत नसल्याने अनेकांना भाड्याच्या घराचा आसरा घ्यावा लागतो. मात्र, आता तुम्ही नवी मुंबईत अवघ्या 15 लाखात घर खरेदी करू शकणार आहे. हे वाचून अनेकांचा विश्वास बसणार नाही, पण मित्रांनो हे खरं आहे. नवी मुंबई सारख्या ठिकाणी एवढ्या कमी किमती घर घेण्याची संधी तुम्हीही सोडू नका. चला जाणून घेऊया संपूर्ण बातमी..

नवी मुंबईतील प्रॉपर्टी प्रदर्शनात 15 लाखाचे घर

मागील दोन दिवसांपासून नवी मुंबईत 23 वे प्रॉपर्टी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यात खासगी विकासकांच्या घरांचा समावेश आहे. यातील घरांच्या किमती 15 लाखांपासून ते 25 कोटींपर्यंत आहे. नवी मुंबईतील हे प्रॉपर्टी प्रदर्शन 24 ते 27 जानेवारीपर्यंत सुरू असणार आहेत. घरांसाठी तत्काळ कर्जपुरवठा देण्याच्या दृष्टीने याठिकाणी वेगवेगळ्या बँका आणि वित्त संस्थांचे स्टॉल्स देखील असणार आहेत. तसेच याठिकाणी विकासक आणि ग्राहकांमध्ये उत्तम समन्वय साधण्यात यावा, यासाठी मार्गदर्शन विभाग देखील असणार आहे. जर तुम्हाला नवी मुंबईत 15 लाखात घर घ्यायचे असेल तर तुम्ही या प्रॉपर्टी प्रदर्शनाला भेट देऊन या प्रॉपर्टीची माहिती घेऊ शकता.

नवी मुंबईत कुठे आहे प्रॉपर्टी प्रदर्शन?

नवी मुंबईत स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी अनेक लोक या प्रदर्शनाला भेट देत देऊन माहिती घेत आहे. हे प्रॉपर्टी प्रदर्शन तांडेल मैदानाच्या बाजूला, पाम बीच रोड, सीवूड्स रेल्वे स्टेशन जवळ, नवी मुंबई याठिकाणी आहे. हे प्रॉपर्टी प्रदर्शन 27 जानेवारी पर्यंत सुरू असणार आहे.

3 thoughts on “अवघ्या 15 लाखात नवी मुंबईत परवडणारी घरे; स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी, पहा बातमी..!”

Leave a Comment