नवीन गृहकर्ज योजना; विनातारण मिळणार गृहकर्ज, पहा योजनेबद्दल माहिती..!

Home Loan Scheme : आपलं हक्काचं पक्क घर असावं अशी प्रतेक मध्यमवर्गीय माणसाची इच्छा असते. मग त्यासाठी आयुष्यभराची कमाई देखील खर्च करायला मागे-पुढे पाहिलं जात नाही. तसेच घरासाठी मोठी रिस्क घेऊन भलंमोठ्ठ गृहकर्जही (Home Loan) काढलं जातं. या गृहकर्जासाठी बॅंकेच्या अनेक चकरा देखील माराव्या लागतात. आपल्या प्रॉपर्टीचे कागदपत्रे बँकांकडे गहाण ठेवावे लागतात. एवढं करून देखील गृह कर्ज मिळेल याची खात्री नसते. पण आता सरकार अल्प-मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी एक नवीन योजना आणण्याच्या तयारीत आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या मते, या योजनेअंतर्गत 20 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज (Home Loan) घेण्यासाठी कोणतेही तारण द्यावे लागणार नाही. म्हणजेच बॅंकेकडे प्रॉपर्टीचे कागदपत्रे गहाण ठेवण्याची गरज पडणार नाहीये.

कमी कागदपत्रात गृहकर्ज

सरकारच्या अशा योजनेमुळे अनेक सामान्य लोकांचे नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तसेच हे गृहकर्ज डिजिटल व्यवहारांद्वारेच मंजूर केले जाणार आहे. त्यामुळे या गृहकर्जासाठी कागदपत्रेही खूपच कमी लागणार आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी थर्ड पार्टी गॅरंटीची देखील कमी गरज भासेल.

30 वर्षांसाठी उपलब्ध असणार नवीन गृहकर्ज (Home loan tenure)

लोकांना गृहकर्ज मिळणे सुलभ व्हावे यासाठी केंद्र सरकारकडून क्रेडिट गॅरंटी फंडासारखे उपाय करण्यात येणार आहे. क्रेडिट गॅरंटी फंड हे उद्योजकांना जलद कर्ज (Instant Loan) देण्यासाठी वापरले जाते.

1 thought on “नवीन गृहकर्ज योजना; विनातारण मिळणार गृहकर्ज, पहा योजनेबद्दल माहिती..!”

Leave a Comment