Mhada 1BHK flat on rent in Mumbai : मुंबईला ‘सपनो की नगरी’ असं म्हटलं जातं. या नगरीत अनेकांची राहण्याची इच्छा असते. मुंबईत दरवर्षी लाखो लोक आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. भरमसाठ नोकर्या, व्यवसाय करण्यासाठी अनुकूल वातावरण आणि सर्व चांगल्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे अनेकांचे पाय मुंबईकडे वळतात. जगातील मोठ-मोठे उद्योग व्यवसाय मुंबईत असल्याने मुंबईला देशाची आर्थिक राजधानी असण्याचा मान मिळालेला आहे. तसे या आर्थिक राजधानीत राहणे सोपे नाही. घरांची मोठी मागणी असल्यामूळे घरांचे दर आणि भाडे खूपच आहे. त्यामुळे लोक स्वस्तात मिळणार्या म्हाडाच्या घरासाठी अर्ज करतात. पण आता मुंबईत तुम्हाला म्हाडाचा 1BHK फ्लॅट (Mhada 1BHK flat) भाड्याने घेता येणार आहे.
मुंबईत घराचे भाडे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे आहेत. तसेच घराच्या आकारानुसार हे भाडे कमी जास्त आहे. नवी मुंबई आणि ठाणे भागात घर भाडे कमी असून येथे 1BHK घरासाठी महिन्याला फक्त 15 ते 30 हजार एवढा खर्च येतो आणि 2BHK घरासाठी 30 हजार ते 60 हजार एवढे भाडे द्यावे लागते. तर पश्चिम उपनगरात 1BHK अपार्टमेंटसाठी 35 ते 50 हजार रुपये तर 2BHK घरासाठी 60 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंतचे भाडे आहे. चला जाणून घेऊया मुंबईतील म्हाडाच्या घराचे भाडे आणि लोकेशन.
म्हाडाच्या 1BHK फ्लॅटचे लोकेशन आणि भाडे किती? (Mhada 1BHK flat rent)
मुंबईत म्हाडाचा 1BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध झाला असून आता तुम्ही हा फ्लॅट भाड्याने घेऊ शकता. हा फ्लॅट शिवमुद्रा हाईट्स, कन्नमवार नगर नं 2, विक्रोळी (पू) मुंबई या लोकेशनवर आहे. या प्रकल्पात तिसर्या मजल्यावर हा फ्लॅट उपलब्ध आहे. यात दोन लिफ्टची सुविधा आहे. तसेच येथे पार्किंगसाठी मोकळी जागा उपलब्ध आहे. हा फ्लॅट एकदम सुटसुटीत आणि नवा कोरा असून या घरात L आकाराचे किचन देण्यात आले आहे. घरातील शिल्लकचे सामान ठेवण्यासाठी स्टोरेज देण्यात आलेले आहे. या फ्लॅटचा कार्पेट एरिया 302 स्क्वेअर फुट (1BHK) एवढा आहे. या फ्लॅट पासून जवळच जनता मार्केट आहे, याठिकाणी तुम्ही चालत जाऊ शकता. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि दुकाने येथून जवळच उपलब्ध आहे. या फ्लॅटचे भाडे 23 हजार एवढे असून डीपाॅझीट म्हणून 70 हजार रुपये भरावे लागणार आहे.
येथे वाचा – आनंदाची बातमी! शिंदेंनी केली एक लाख घरांची घोषणा; लाखो लोकांना मिळणार म्हाडाचे घर.!
भाड्याने घेण्यासाठी येथे करा संपर्क
जर तुम्हाला म्हाडाचा हा 1BHK फ्लॅट भाड्याने घ्यायचा असेल तर तुम्ही खालील नंबर वर संपर्क करू शकता आणि या घराबद्दल चौकशी करू शकता. आदित्य एंटरप्राइजेस – 9082358882 / 9324242017, युट्युब वर या घराचा व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे, आपण खालील व्हिडिओ पाहू शकता.
घराचा व्हिडिओ पहा
Required this flat. Purchase this what is cost