Home Loan : मित्रांनो, तुम्ही होम लोन घेतले आहे का? किंवा आता घेण्याचा विचार करताय? असं असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे! आपल्या देशातील प्रमुख 6 बँकांनी होम लोन स्वस्त केलं आहे. या बॅंकांनी होम लोनचे व्याजदर कमी करून होम लोन घेणाऱ्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. यामुळे आता होम लोनचा मासिक हप्ता कमी होणार असून डोक्यावरील हप्त्याचे ओझे कमी होणार आहे. तसेच याचा दीर्घकाळासाठी मोठा फायदा होणार आहे. जर या यादीत तुमची बँक असेल तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे. त्वरित जाणून घ्या फायद्याची बातमी..
या 6 बँकांनी स्वस्त केले होम लोन
रिझर्व्ह बँकेकडून (RBI) 7 फेब्रुवारी 2025 रोजी पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीत रेपो दरात 0.25% म्हणजेच 25 बेसिस पॉइंट्सने कपात करण्यात आली. यामुळे आता रेपो दर 6.25% झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा दर स्थिर होता, पण आता होम लोन घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आता देशातील सहा मोठ्या बँकांनी होम लोनच्या व्याजदरात कपात करण्यास सुरुवात केली आहे. यात बँक ऑफ इंडिया (BOI), कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक (PNB), युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा या 6 बँकांचा समावेश आहे. खाली पहा बँक आणि त्यांचे नवे दर..
पहा, कसे आहेत नवीन दर?
(1) बँक ऑफ इंडिया – बँक ऑफ इंडियाने आपला आरएलएलआर (RLLR) 9.35% वरून 9.10% केला आहे. हा बदल 7 फेब्रुवारी 2025 पासून अंमलात आला आहे.
(2) कॅनरा बँक – कॅनरा बँकेने आपला “आरएलएलआर” (RLLR) 9.25% वरून घटवून 9.00% केला आहे. हा नवीन दर 12 फेब्रुवारी 2025 पासून लागू होईल. तसेच हा दर फक्त त्या खात्यांना लागू असेल जे 12 फेब्रुवारी 2025 नंतर उघडले जातील किंवा ज्यांनी RLLR प्रणाली अंतर्गत 3 वर्षे पूर्ण केली आहेत.
(3) बँक ऑफ बडोदा – बँक ऑफ बडोदाकडून बीआरएलएलआर (BRLLR) 8.90% पर्यंत कमी करण्यात आला आहे. हा दर 10 फेब्रुवारी 2025 पासून लागू झाला आहे.
(4) युनियन बँक ऑफ इंडिया – युनियन बँकेकडून आरएलएलआर (RLLR) दर 9.25% वरून 9.00% करण्यात आला आहे. हा बदल 11 फेब्रुवारी 2025 पासून करण्यात आला आहेत.
(5) इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) – इंडियन ओव्हरसीज बँकने (IOB) आपल्या RLLR दरात बदल करून 9.35% वरून 9.10% असा केला आहे (25 बेसिस पॉईंट्सची घट). हा बदल 11 फेब्रुवारी 2025 पासून करण्यात आला आहे.
(6) पंजाब नॅशनल बँक (PNB) – पंजाब नॅशनल बँकने (PNB) आपला आरएलएलआर (RLLR) 9.25% वरून 9.00% केला आहे. हा बदल 10 फेब्रुवारी पासून करण्यात आला आहे.
होम लोन घेणाऱ्या ग्राहकांवर काय परिणाम होणार?
नवीन कर्ज स्वस्त होईल. आरएलएलआर कमी झाल्यामुळे नवीन होम लोनवरील व्याजदर कमी होईल. याचा अर्थ, नवीन होम लोन घेणाऱ्यांना आधीपेक्षा कमी हप्ता (ईएमआय) भरावा लागेल. तसेच जुन्या ग्राहकांचा देखील हप्ता म्हणजेच ईएमआय कमी होऊ शकतो.
येथे वाचा – मुंबईत म्हाडाचा 1BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध, तुम्हाला घ्यायचा का? पहा घराचे भाडे आणि लोकेशन..!