मुंबईकरांनो! घर की दुकान… काय घ्यावे? जास्त फायदा कशात? पहा तुमच्या फायद्याची माहिती..!

मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का की तुमचे पैसे कुठे गुंतवले तर ते झपाट्याने वाढतील? म्हणजे दुकान घ्यावं की घर, कुठून जास्त फायदा होईल? आजकाल लोक आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी कुठे ना कुठे पैसे लावतच असतात. कोणी म्हणतं, “मालमत्ता घेतली तर फायदा होईल,” तर कोणी म्हणतं, “नाही, बँकेची एफडीच बेस्ट आहे, सुरक्षित आहे.” पण खरं सांगू का, एफडीचा परतावा मालमत्तेसारखा जास्त नसतो. जर तुम्हाला खरंच चांगला नफा कमवायचा असेल, तर योग्य ठिकाणी पैसे लावणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी थोडं गुंतवणुकीचं ज्ञान असलं की सोनं झालंच समजा!

आपल्याकडे बरेच लोक एफडीवर भर देतात, काही म्युच्युअल फंडात पैसे टाकतात, तर काहींना मालमत्तेतच गुंतवणूक करायला आवडतं. गेल्या काही वर्षांत मालमत्तेच्या किमती तर गगनाला भिडल्या आहेत! अशात घर, दुकान किंवा फ्लॅट (Flats) घेणं म्हणजे मोठी गोष्ट झालीय. पण मालमत्ता म्हणजे फक्त घरे नाही, तर व्यावसायिक मालमत्ताही असते – म्हणजे दुकानं, ऑफिसेस वगैरे. पण व्यावसायिक मालमत्ता ही निवासीपेक्षा जास्त महाग का असते, याचा कधी विचार केलाय?

व्यावसायिक की निवासी – काय घ्यावं?

मालमत्तेत पैसे लावले की ती तुमच्यासाठी कमाईचं साधन बनते. भाड्याने देऊन तुम्ही चांगले पैसे मिळवू शकता. आता जर तुम्ही म्हणत असाल, “मला थोडं जास्तीचं उत्पन्न हवंय,” तर मग विचार करा – व्यावसायिक मालमत्ता की निवासी, तुमच्यासाठी काय बेस्ट आहे?

निवासी मालमत्तेबद्दल बोलायचं तर – म्हणजे घर, फ्लॅट वगैरे – हे घेतलं की तुम्ही स्वतः तिथे राहू शकता किंवा कोणाला तरी भाड्याने देऊ शकता. म्हणजे राहण्यासाठी बांधलेली कोणतीही जागा म्हणजे निवासी मालमत्ता. पण मजा बघा, याचा काही भाग तुम्ही व्यावसायिक वापरासाठीही ठेवू शकता. समजा, अर्ध्या जागेत तुम्ही छोटं दुकान किंवा व्यवसाय सुरू केला आणि बाकी जागेत राहायचं ठरवलं, कसं वाटतं?

आता व्यावसायिक मालमत्तेची गोष्ट वेगळी आहे. दुकानं, शोरूम, ऑफिसेस – याला म्हणतात व्यावसायिक मालमत्ता (commercial property). यात रिटेल स्टोअर्स, गोदामं, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स असं सगळं येतं. लोक यातून व्यवसाय सुरू करतात किंवा जास्त भाडं मिळेल म्हणून दुकानं भाड्याने देतात. यातून कमाई चांगलीच होते!

घर घ्यावे की दुकान? 

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासमोर दोन मार्ग आहेत – निवासी आणि व्यावसायिक. दोन्हींचे फायदे आहेत, तोटेही आहेत. हे सगळं तुमच्या गरजा, ध्येयं आणि किती पैसे लावू शकता यावर अवलंबून आहे. पण जर तुम्हाला खरंच जास्त उत्पन्न हवं असेल, तर मला वाटतं व्यावसायिक मालमत्ता जास्त फायदेशीर ठरेल. कारण का? तर त्याला निवासीपेक्षा जास्त भाडं मिळतं!

व्यावसायिक मालमत्तेत जास्त फायदा

एक उदाहरण देतो – निवासी मालमत्ता वर्षाला 1 ते 2 टक्के परतावा देते, पण व्यावसायिक मालमत्तेतून 8 ते 11 टक्के फायदा मिळू शकतो. शिवाय, रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला मालकी मिळते, करात सूट मिळते आणि भाड्याचं उत्पन्नही मिळतं. शेअर मार्केटसारखं इथे जास्त चढ-उतार नसतात. त्यामुळे जर तुम्हाला फक्त भाड्याचं उत्पन्न हवं असेल, तर व्यावसायिक मालमत्तेत पैसे लावणं फायद्याचं ठरेल.

तर मित्रांनो, काय वाटतं? दुकान घेणार की घर? कुठे गुंतवणूक कराल? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा..

Leave a Comment