अलीकडच्या काळात महिलांसाठी खास योजना आणल्या जात आहे. लाडकी बहिण योजना, बसमध्ये 50 टक्के सवलत या सारख्या योजनांमुळे महिलांना मोठा लाभ मिळत आहे. अलीकडेच महिलांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या महिलेने जर मुंबईत घर (House in Mumbai) खरेदी केले, तर त्या महिलेला किंमतीमध्ये तब्बल 2 लाख रुपयांची अतिरिक्त सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया-महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्टीने घेतला असून याचा महिलांना घर खरेदीत मोठा फायदा होणार आहे. महिलांनी स्वतःच्या नावावर घर खरेदी करावे याला प्रोत्साहन मिळण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. (discount of Rs 2 lakh for women to buy a house in Mumbai)
घर खरेदी करणार्यांना अनेक सवलती
या एक्स्पो मध्ये 2 लाखाच्या सवलतीसह अजून अनेक सवलती मिळणार आहे. यात स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटी यासह तब्बल 18 लाख रुपयांपर्यंत सवलतींचा समावेश करण्यात आला आहे. हा एक्स्पो 17 ते 19 जानेवारी या काळात होणार आहे. यात 19 जानेवारी रोजी पिंक संडे आहे. या एक्स्पोत सहभाग घेणार्या बिल्डर्सकडून देण्यात येणार्या सवलतींव्यतिरिक्त ही सवलत असणार असल्याची महत्वाची माहिती CREDAI-MCHI चे धवल अजमेरा यांच्याकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वर्षी प्रदर्शनामध्ये घर खरेदीची प्रक्रिया खूपच सोपी करण्यात येणार आहे. फक्त 10 मिनिटांमध्ये घराची नोंदणी (House Registration) करण्यात येणार आहे.
500 हून अधिक प्रोजेक्टचे प्रदर्शन होणार
पीटीआय कडून मिळालेल्या वृत्तानुसार, CREDAI-MCHI कडून मुंबई असलेल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन या सेंटरमध्ये 32 वे प्रॉपर्टी अँड हाऊसिंग फायनान्स एक्झबिशन आयोजित करण्यात आले असून यामध्ये 100 पेक्षा जास्त बिल्डर्स सहभागी होणार आहे आणि त्यांच्याकडून 500 पेक्षा जास्त प्रोजेक्ट या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे.
I need to know the process for the same how to apply
Iam interested
New home purchase
I am single mother of two kids. I want to book my house in Mumbai.
Hi
Interested