SBI की HDFC..? तुमच्यासाठी कोणत्या बँकेचे गृहकर्ज सर्वात फायदेशीर? जाणून घ्या स्वस्त होम लोन चा पर्याय..!

SBI Vs HDFC Home Loan: आजकाल स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. जमिनीच्या आणि घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, त्यामुळे अनेक जण गृहकर्जाचा पर्याय निवडतात. पण कोणत्या बँकेकडून कर्ज घ्यावे? कोणता व्याजदर सर्वात परवडणारा आहे? आणि EMI किती येईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. आता आपण SBI आणि HDFC या देशातील दोन मोठ्या बँकांच्या गृहकर्ज व्याजदराची तुलना करून जाणून घेऊया की तुमच्यासाठी कोणता पर्याय फायदेशीर ठरू शकतो.

पूर्वीच्या काळात कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहायचे, पण आज प्रत्येकालाच स्वतःचे हक्काचे घर हवे आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे आणि घरांच्या किमतींमुळे एका वेळेस लाखो रुपये भरणे कठीण झाले आहे. त्यामुळे गृहकर्ज हा एक उत्तम पर्याय ठरतो. पण गृहकर्ज घेताना व्याजदर हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. लहानशा टक्केवारीतील फरक देखील दीर्घकाळासाठी मोठा आर्थिक फरक करू शकतो.

काय सांगता..? घरकुल अनुदानात तब्बल इतक्या रुपयांची वाढ… आता हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार…!

SBI गृहकर्ज

एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असून, सरकारच्या अधिपत्याखाली असल्यामुळे अनेक ग्राहकांना तिच्यावर अधिक विश्वास आहे. एसबीआय सध्या 8.25% वार्षिक व्याजदराने गृहकर्ज देत आहे. मात्र, हा किमान व्याजदर आहे आणि तो फक्त चांगला CIBIL स्कोर असलेल्या ग्राहकांसाठी लागू आहे.

SBI गृहकर्जाचा EMI किती येईल?

जर एखाद्या ग्राहकाला 8.25% व्याजदराने 30 लाख रुपये कर्ज मंजूर झाले आणि कालावधी 15 वर्षे असेल, तर त्याचा EMI ₹29,104 असेल. म्हणजेच, कर्जाच्या मुदतीदरम्यान हा ग्राहक एकूण ₹22,38,758 इतके फक्त व्याज भरणार आहे. एसबीआय ही भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) घोषित केलेल्या सर्वात सुरक्षित बँकांपैकी एक आहे. त्यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी हा एक सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय आहे.

सिडकोचा मोठा धमाका! नवी मुंबईत फक्त एवढ्या लाखात घर; तब्बल 67 हजार घरे तयार, पहा घरांच्या लोकेशनची यादी..!

HDFC गृहकर्ज

एचडीएफसी बँक देखील भारतातील सर्वात मोठ्या आणि सुरक्षित बँकांपैकी एक आहे. ही बँक गृहकर्जासाठी सध्या 8.75% व्याजदर लागू करत आहे. मात्र, हा देखील किमान व्याजदर असून चांगला CIBIL स्कोर असलेल्या ग्राहकांनाच तो लागू होतो.

HDFC गृहकर्जाचा EMI किती येईल?

जर एखाद्या ग्राहकाला 8.75% व्याजदराने 30 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले आणि मुदत 15 वर्षे असेल, तर त्याचा EMI ₹29,983 येईल. म्हणजेच, कर्जाच्या संपूर्ण कालावधीत ग्राहकाला ₹23,97,023 इतके व्याज भरावे लागणार आहे. HDFC ही प्रायव्हेट बँक असली तरी ग्राहकांना वेगवान सेवा आणि सुलभ प्रक्रिया मिळते. त्यामुळे अनेक लोक गृहकर्जासाठी HDFC ला पसंती देतात.

आता प्रश्न हा आहे की दोन्ही बँकांपैकी कोणते गृहकर्ज अधिक परवडणारे आहे? तर वरील माहितीवरून हे होते की SBI गृहकर्जाचा EMI आणि एकूण व्याज थोडे कमी आहे, त्यामुळे दीर्घकाळासाठी SBI कर्ज हा अधिक चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, जलद प्रक्रिया आणि चांगली सेवा हवी असल्यास HDFC चा विचार करता येईल.

Leave a Comment