सिडकोचा मोठा धमाका! नवी मुंबईत फक्त एवढ्या लाखात घर; तब्बल 67 हजार घरे तयार, पहा घरांच्या लोकेशनची यादी..!

जर तुम्ही नवी मुंबईत घर (1 BHK flats Navi Mumbai) घेण्याचा विचार करत असाल, तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! सिडकोकडून तब्बल 67,235 घरे (CIDCO flats) तयार करण्यात येत आहे. ही घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधली जात असून, ती तीन टप्प्यांत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यातच 26,000 घरांची लॉटरी जाहीर केली जाणार आहे. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्ण झाले असून, लवकरच येथे विमानसेवा सुरू होणार आहे. त्यासोबतच, नवी मुंबई परिसर आता झपाट्याने विकसित होत आहे, आणि याच भागात “तिसरी मुंबई” आकार घेत आहे. जर तुम्ही या भागात घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ आहे! कारण सिडको पुढील सहा महिन्यांत मोठी लॉटरी जाहीर करण्याची शक्यता आहे, जिथे तुम्हाला परवडणाऱ्या घरांची (Affordable Flats) संधी मिळू शकते.

नवी मुंबईत विमानतळ तयार झाल्यानंतर घरांच्या किमती अक्षरशः गगणाला भिडल्या आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्यांचा कल सिडकोच्या परवडणाऱ्या घरांकडे अधिक आहे. सिडकोकडून परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून दिली जात असल्याने, अनेक जण या संधीचा लाभ घेण्यास उत्सुक आहेत. विशेषतः वाशी, जुईनगर, कळंबोली, खारघर आणि तळोजा या भागांत सिडकोची घरे खाजगी घरांच्या तुलनेत कमी किंमतीत उपलब्ध आहेत.

हे बांधले जात असलेले सिडकोचे फ्लॅट्स (CIDCO flats) पीएम आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस तसेच निम्न-उत्पन्न गटासाठी असणार आहेत. वाशी ते तळोजा दरम्यानच्या प्रत्येक रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकाजवळ ही घरे बांधण्यात आली आहेत, त्यामुळे प्रवासासाठीही अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे.

सिडकोच्या घरांची किंमत किती असेल? जाणून घ्या सविस्तर!

जर तुम्ही नवी मुंबईत घर घेण्याचा विचार करत असाल, तर सिडकोकडून बामणडोंगरी रेल्वे स्टेशनजवळ 5100 घरे बांधली गेली आहेत, आणि त्यांची किंमत फक्त 30 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे, बामणडोंगरीमधील खासगी घरांच्या तुलनेत ही किंमत तब्बल 40% कमी आहे. फक्त घरच नाही, तर मुलांसाठी खेळण्याची गार्डन आणि इतर आधुनिक सोयी-सुविधाही येथे उपलब्ध आहेत.

आधीच, सिडकोने 25,700 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती, आणि त्यातील 19,500 जणांना घरं मिळाली आहेत. आता 2027 पर्यंत सिडकोची उर्वरित घरेही पूर्ण होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसेच इतर लोकेशन्सच्या किंमतींची माहिती देखील मिळाली आहे. खारघर स्टेशनजवळचे घर 97 लाख रुपयांना असून तळोजातील घराची किंमत 25 लाख रुपये एवढी आहे.

सिडकोची 67 हजार घरे कोणत्या लोकेशनवर असणार? पहा संपूर्ण यादी!

सिडकोच्या परवडणाऱ्या घरांची वाट पाहणाऱ्यांसाठी ही माहिती खूपच उपयुक्त ठरू शकते! कारण सिडकोने 67 हजार घरे वेगवेगळ्या लोकेशन्सवर उभारली आहेत. चला तर मग पाहूया, कोणत्या भागात कोणत्या गटांसाठी घरे उपलब्ध आहेत:

(1) EWS (अत्यल्प उत्पन्न गट) साठी घरे:

वाशी ट्रक टर्मिनस

खारघर बस टर्मिनल

मानसरोवर रेल्वे स्टेशन

तळोजा सेक्टर 37

नावडे प्लॉट 2

पनवेल बस स्टँड

(2) LIG (निम्न-उत्पन्न गट) साठी घरे:

जुईनगर रेल्वे स्टेशन

खारघर रेल्वे स्टेशन

बामणडोंगरी रेल्वे स्टेशन

खारकोपर पश्चिम रेल्वे स्टेशन

तळोजा सेक्टर 39, 28, 31

कळंबोली बस डेपो

नावडे प्लॉट 1

(3) EWS + LIG दोन्ही गटांसाठी घरे:

खारकोपर पूर्व रेल्वे स्टेशन

तळोजा सेक्टर 29

Leave a Comment