पुण्याच्या या भागात चुकूनही घेऊ नका भाड्याने घर; भाडे ऐकून बसेल धक्का..!

Pune Real Estate : तुम्हीही पुण्यात घर (1BHK Flat Pune) घेण्याचा विचार करत असाल किंवा भाड्याने राहण्याचा विचार करत असाल? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे! गेल्या काही वर्षांत प्रॉपर्टीचे दर अक्षरशः गगनाला भिडलेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, वसई-विरारसारख्या शहरांमध्ये घरांच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की, आता सर्वसामान्य माणसासाठी स्वतःचे घर घेणे स्वप्नच वाटू लागलंय. त्यामुळे अनेक लोक भाड्याच्या घरात राहणं पसंत करतायत. पण गंमत पहा, भाडंही आता स्वस्त राहिलेलं नाही! पुण्यात तर परिस्थिती अशी आहे की, गेल्या काही वर्षांत घरांच्या किमती वाढल्या, पण त्याहून जास्त वाढ झाली आहे घर भाड्यांत!

पुण्यात घर भाड्याची रेकॉर्डब्रेक वाढ (House rent Pune)

तुम्हाला ठाऊक आहे का? मागच्या तीन वर्षांत पुण्यात घरांच्या किमती 37% नी वाढल्या आहेत. पण, घर भाडं? ते तब्बल 57 ते 65% नी वाढलंय! म्हणजे आता पुण्यात घर घेणं महागच नाही, तर भाड्यानं राहणंसुद्धा अवघड झालंय.

पुण्यातील सर्वाधिक घर भाडे असलेले भाग

जर तुम्ही पुण्यात राहत असाल किंवा घर घेण्याचा विचार करत असाल, तर हिंजवडी आणि वाघोली हे दोन भाग लक्षात ठेवा. हे दोन्ही परिसर पुण्यातील सर्वात महागडे ठरले आहेत. का? कारण येथे आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्यामुळे घरांसाठी प्रचंड मागणी आहे.

या कारणामुळे हिंजवडी ठरतंय महाग घर भाड्याचे ठिकाण

हिंजवडी परिसरात 2021 मध्ये 2BHK (1000 sq. ft.) घराची किंमत 5710 रुपये प्रति चौरसफूट होती. तर अलीकडे 2024 च्या अखेरीस ही किंमत 7800 रुपये प्रति चौरसफूट झाली! म्हणजेच 37% वाढ झाली आहे. पण जर घर भाड्याची स्थिती बघितली तर 2021 मध्ये 2BHK घर भाडं 17,800 रुपये होतं. अलीकडे 2024 अखेर हेच भाडं 28,000 रुपये झालं! म्हणजे तब्बल 57% वाढ झाली आहे.

वाघोलीत एवढे वाढले घर भाडे

वाघोलीत 2BHK घराची किंमत 2021 मध्ये 4960 रुपये प्रति चौरसफूट होती. अलीकडे 2024 मध्ये ही किंमत 6800 रुपये प्रति चौरसफूट झाली, म्हणजे 37% वाढ झाली आहे. तसेच 2021 मध्ये 2BHK घर भाडं 14,200 रुपये होतं. पण आता तेच भाडं 23,500 रुपये पर्यंत गेलंय, म्हणजे 65% वाढ झाली आहे.

येथे वाचा – गृह कर्जाचा हप्ता भरणाऱ्यांनो! या टिप्स करणार एका झटक्यात तुमच्या अडचणी दूर..!

मग आता पर्याय काय?

पुण्यात घर घेणं किंवा भाड्यानं राहणं, दोन्ही महाग झालंय. पण जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल, तर सध्याच्या ट्रेंडनुसार किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे योग्य वेळी निर्णय घ्या. आणि भाड्याने राहायचं असेल, तर थोडं लांबच्या भागात कमी भाड्यात घर मिळू शकतं का, हे शोधणं फायद्याचं ठरू शकतं.

Leave a Comment