Opportunity to buy flat : अनेक लोक नवीन वर्षाच्या तोंडावर फ्लॅट, प्लॉट तसेच जमीन खरेदी करत असतात. नवीन वर्षात हक्काचे घर खरेदी करून जीवनाची नवीन सुरुवात करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण शहरातील वाढलेल्या घरांच्या किंमतींमूळे अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. त्यामुळे अनेक लोक म्हाडा लॉटरी तसेच सिडको लॉटरीची प्रतीक्षा करत असतात. आता तुम्ही म्हाडा लॉटरी शिवाय कमी किमतीत हक्काचे घर, दुकान घेऊ शकता. त्यासाठी नेमकी काय प्रक्रिया असणार? याची माहिती आपण येथे पाहणार आहोत. (Opportunity to buy a shop, flat at a cheap price; Buy property in the new year)..
नवीन वर्षात नवीन घर घेण्याची संधी बँक ऑफ बडोदाने तुमच्यासाठी आणली आहे. घराचे स्वप्न करण्यासाठी बँक ऑफ बडोदाने एक योजना आणली आहे. ही योजना म्हणजे मेगा ई-ऑक्शन. यात तुम्ही बोली लावून खूपच कमी किमतीत घर, दुकान आणि इतर प्रॉपर्टी खरेदी करू शकता. तुमचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँकेकडून 22 जानेवारी आणि 6 फेब्रुवारी रोजी मेगा ई-ऑक्शन करणार आहे. यात तुम्हाला घर, फ्लॅट खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. अशी माहिती बँक ऑफ बडोदाने ट्वीट करून दिली आहे.
मेगा ई-ऑक्शनचे फायदे काय?
बँक ऑफ बडोदाच्या या मेगा ई-ऑक्शन मधून प्रॉपर्टी खरेदी करण्याचे काही फायदे आहेत. यात तुम्हाला कोणत्याही प्रॉपर्टी वर क्लियर टायटल, लगेच ताबा आणि बँक लोन सुद्धा मिळते.
येथे वाचा – आता सिडकोचे घर घेणे सोपे होणार, सिडकोच्या नियमात होणार मोठा बदल..!
ऑक्शनमध्ये बोली कशी लावणार?
बँक ऑफ बडोदाच्या मेगा ई-ऑक्शनमध्ये सहभाग घेण्यासाठी IBAPI या वेबसाइट वर भेट द्यावी लागेल. यावर तुम्ही राज्य, जिल्हा आणि बँकांनुसार प्रॉपर्टी शोधू शकतात. तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही bankofbaroda.in या बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
येथे वाचा – गूड न्यूज! मुंबईत म्हाडाची नवीन लॉटरी, ग्राहकांना मिळणार ही नवीन सुविधा..!