आता ठाण्यात म्हाडाचे घर घेण्याची संधी! म्हाडाची 2 हजार घरांची लॉटरी, एका क्लिकवर पहा माहिती..!

MHADA Lottery 2025 : सध्या तुम्ही ठाण्यात घर घेण्याचा विचार करत असाल, तर आता म्हाडा तुम्हाला घर घेण्याची सुवर्णसंधी देत आहे! ठाण्यात लवकरच 2 हजार घरांसाठी लॉटरी (Housing Lottery) काढली जाणार आहे. यात तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत उत्तम घर मिळू शकतं. गेल्या काही दिवसांपूर्वी म्हाडाने कोकण मंडळाची सोडत काढली होती. त्यात 2 हजार 147 सदनिका आणि 110 भूखंड विक्री करण्यासाठी होते आणि त्यासाठी जवळपास 24 हजार 911 एवढे अर्ज अनामत रकमेसह म्हाडाकडे आले होते. पण त्या सोडतीत बऱ्याच जणांचा हिरमोड झाला होता. आता त्यांना देखील नवीन घराच्या योजनेत घर घेण्याची संधी पुन्हा मिळाली आहे. कारण आता कोकण मंडळाकडून पुन्हा नवीन घराची योजना (New Housing Scheme) आणण्यात आली आहे.

चितळसरमध्ये 1173 घरांसाठी संधी (म्हाडाची नवी लॉटरी लवकरच)

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या सोडतीत ज्यांना घर मिळाले नाही, त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. पुढील काही महिन्यांत म्हाडा सुमारे 2,000 नवीन घरांसाठी लॉटरी काढणार आहे. यामध्ये सर्वात जास्त घरे चितळसर परिसरात असतील. चितळसरमध्ये 1,173 घरे असणार आहेत. शिवाय, ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर घरांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरवर्षी 30,000 घरांसाठी नियोजन!

म्हाडाकडून राज्यभरात दरवर्षी सुमारे 30,000 घरांसाठी सोडत काढण्याचे नियोजन करण्यात आले असून, दर 3 ते 6 महिन्यांत कुठल्या ना कुठल्या मंडळाची लॉटरी जाहीर केली जाणार आहे. गेल्या दीड वर्षात म्हाडाच्या कोकण मंडळाने तीन सोडतींमध्ये तब्बल 10,000 कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. यंदाही कोकण मंडळ सुमारे 2,000 घरांसाठी लॉटरी काढण्याच्या तयारीत आहे. यामध्ये चितळसर या ठिकाणी उभारलेली 1,173 घरांसह, 15 टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजना तसेच 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत मिळालेल्या घरांचादेखील समावेश असणार आहे.

येथे वाचा – मुंबईकरांनो! आता मिळवा दहापट मोठे घर; फक्त करा हा एक प्रयोग..!

ठाणे पालिका ना हरकत प्रमाणपत्र कधी देणार?

चितळसरमध्ये म्हाडाने 22 मजली असलेल्या अशा 7 इमारती उभारल्या आहेत. मात्र, या परिसरातील पाणी आणि रस्त्याच्या सुविधांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. ठाणे महानगरपालिकेकडून या इमारतींना अजूनही ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही, त्यामुळे सोडतीची प्रक्रिया रखडून पडलेली आहे. एकदा हे प्रमाणपत्र मिळाले की, ही सर्व घरे लॉटरीत समाविष्ट होतील आणि जास्तीत जास्त लोकांना परवडणाऱ्या घरांचा लाभ मिळू शकेल.

येथे वाचा – आज लोनवर घर घ्यावे की भाड्याने रहावे? एक्सपर्टचं ऐकाल तर फायद्यात राहाल..!

Leave a Comment