Mumbai : सध्याच्या काळात मुंबई पुण्यात रिअल इस्टेट (Real estate) क्षेत्राची मोठी चर्चा होते. मोठ्या शहराच्या मागोमाग आता छोट्या शहरात देखील प्रॉपर्टीचे भाव वाढले आहे. घर तसेच फ्लॅट घेणे हा माणसाच्या जीवनातला खूपच महत्वाचा निर्णय असतो. त्यामुळे फ्लॅट घेण्याचा निर्णय खूप विचार करून घेतला जातो. आज शहरी भागात नवीन फ्लॅट मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि जुने फ्लॅट देखील उपलब्ध असून त्यांची प्रचंड विक्री होत आहे. त्यामुळे फ्लॅट खरेदी करत असताना नवीन फ्लॅट घ्यावा की जुना फ्लॅट असा प्रश्न अनेकांना सतावत असतो. पण तुम्ही कोणता फ्लॅट घ्यावा हे तज्ञांनी स्पष्टच सांगितले आहे.
नवीन फ्लॅट कोणी घ्यावा?
रिअल इस्टेट तज्ञांच्या मते जर एखादा व्यक्ती राहण्यासाठी फ्लॅट खरेदी करत असेल तर त्याने नवीन फ्लॅट घ्यावा. कारण नवीन फ्लॅटमध्ये तसेच बिल्डिंगमध्ये आताच्या सर्व नवीन सुविधा मिळतात. त्यात घर नवीन असल्याने अनेक वर्ष मेंटेनंन्स वर खर्च करावा लागत नाही. फक्त सुरुवातीलाच नवीन फ्लॅट खरेदी करताना जास्तीचे पैसे द्यावे लागतात. त्यामुळे थोडंसं शिल्लक बजेट असणारे नवीन फ्लॅट (New Flat) घेण्याचा निर्णय घेऊ शकता.
येथे वाचा – खुशखबर! आता मुंबईत घर खरेदी करताना वाचवा 20 ते 25 लाख, प्रॉपर्टी डीलरने सांगितली एक सोपी ट्रिक..!
जुना फ्लॅट कोणी घ्यावा?
सर्वात महत्वाचे म्हणजे जर तुमचं बजेट तोडके मोडके असेल तर जुना फ्लॅट घेणे उत्तम होईल. तसेच भाड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी किंवा गुंतवणुक करू इच्छिणाऱ्यांसाठी जुना फ्लॅट खरेदी करणे योग्य समजले जाते. पण जुना फ्लॅट खरेदी करताना कागदपत्रांची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. जुना फ्लॅट घेताना चांगल्या लोकेशनची निवड केल्यास भविष्यात फ्लॅट विकताना मोठा फायदा होऊ शकतो.
येथे वाचा – अवघ्या 15 लाखात नवी मुंबईत परवडणारी घरे; स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी, पहा बातमी..!
जुना फ्लॅट खरेदी करताना हे लक्षात ठेवा
जुना फ्लॅट घेत असताना सर्वात अगोदर त्यावर काही कायदेशीर अडचणी तर नाही ना हे तपासा. फ्लॅटची रजिस्ट्री मालकाकडून करून घ्या. तसेच तुम्ही खरेदी करत असलेल्या फ्लॅटवर रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन तसेच सरकारचे (Government) कोणतेही देणे नसावेत.
रिअल इस्टेट तज्ञांच्या मते फ्लॅट नवीन घ्या की जुना, हे सर्व व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीसाठी नवीन फ्लॅट घेणे फायदेशीर असेल तर दुसर्या व्यक्तीसाठी जुना फ्लॅट खरेदी करणे फायदेशीर असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फ्लॅट नवीन असो की जुना, दोघांचेही काही फायदे तोटे आहेत.